श्रीनगरमधील लाल चौकात सोमवारी दहशतवाद्यांनी सीआरपीएफवर हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान शहीद झाल्याचे सांगण्यात येत आहे. श्रीनगरमधील दहशतवादी हल्ल्यात एक CRPF जवान शहीद झाला आहे, तर एक जखमी झाला आहे, त्याला SMH रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले. हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस आणि सुरक्षा दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिसराला वेढा घातला असून दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.
तर रविवारी संध्याकाळी, पुलवामा जिल्ह्यातील लिटर परिसरात दहशतवाद्यांनी पोल्ट्री कार्ट घेऊन आलेल्या दोन गैर-काश्मीरींना गोळ्या घालून ठार केले. दोघांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघेही पंजाबमधील पठाणकोटचे रहिवासी आहेत.