काश्मीरमध्ये स्थानिक आणि सुरक्षा दलांमध्ये बाचाबाची

जम्मू आणि काश्मीरमध्ये स्थानिक आणि सुरक्षा दलांमध्ये बाचाबाची झाली. श्रीनगरमधील ईदगाह मैदानात मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले होते. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रू धूराचा वापर केला.

जम्मू काश्मीरमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करुन पोलिसांनी ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्याची परवानगी नाकारली होती. ईदगाह मैदानावर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी या ठिकाणी जमावबंदी लागू केली होती. मात्र तरीही लोक मोठ्या संख्येने ईदगाह मैदानावर जमा झाले होते.

यावेळी जमावाने पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांना नाईलाजास्तव अश्रू धुराचा वापर करावा लागला. यासोबतच अनंतनागमध्येदेखील जमाव आणि सुरक्षा दलाचे जवान आमनेसामने आले.

वेबदुनिया वर वाचा