केरळमधील अलाप्पुझा जिल्ह्यातील कलावूर येथे झालेल्या एका दुःखद रस्ते अपघातात 19 वर्षीय धावपटू लक्ष्मी लाल हिचा मृत्यू झाला. सोमवारी संध्याकाळी लक्ष्मी तिच्या स्कूटरवरून सरावासाठी मारारीकुलम साउथ येथील प्रीतिकुलमकारा स्टेडियममध्ये जात होती. अनुभवी धावपटू विनिता देखील तिच्यासोबत होती.
वाटेत एका ट्रेलर लॉरीने त्यांच्या स्कूटरला धडक दिली. अपघातात लक्ष्मीचा जागीच मृत्यू झाला, तर विनिता जखमी झाली. तिला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.