आता सोनूच्या समर्थनास उतरला सुनील ग्रोवर

बुधवार, 19 एप्रिल 2017 (12:12 IST)
बॉलीवूड पार्श्वगायक सोनू निगमच्या ट्विटवर विवाद काही केल्या थांबण्यात येत नाही आहे. सोनू निगमच्या ट्विटबद्दल कॉमेडियन सुनील ग्रोवरने म्हटले की तो कुणाच्याही धार्मिक भावनांना ठेस पोहचवू शकत नाही.  
 
एका ट्विटमध्ये त्याने लिहिले, "मी सोनू निगमला ओळखतो. तो कुणाच्या धार्मिक भावनांना ठेस पोहचवू शकत नाही. तो सर्वांचा मान ठेवतो. त्याच्या गोष्टींना सांप्रदायिक रंग देऊ नका."
अभिनेत्री ऋचा चड्ढाने देखील ट्विट करून लिहिले, "लोक आपल्या ट्विटचे चुकीचा अर्थ काढतील आणि याला सांप्रदायिक रंग देण्याचा प्रयत्न करतील. पण जे आज तुम्हाला ओळखतात त्यांना हे माहीत आहे की तुमचा उद्देश कोणाचा तिरस्कार करण्याचा नव्हता."
अभिनेत्री रेणुका शहाणेने पण एका फेसबुक पोस्टामध्ये प्रश्न केला आहे की देवाला सर्व माहीत आहे तर आम्ही बगैर  आवाज करून त्याच्या प्रती आपली अधिक भक्ती कसे दाखवू शकतो.  
 
तिने लिहिले "‍ त्याला आपली गोष्ट म्हणायचा पूर्ण हक्क आहे आणि मी त्याचा सन्मान करते. हो पण त्याची बाब मांडण्याची पद्धत थोडी चुकीची होती. संगीतच्या त्याच्या एवढ्या मोठ्या करियरमध्ये कदाचितच हाच एक चुकीची सूर असेल, किंवा तो 'राइट' नोट लावण्याचा प्रयत्न करत असेल. कोणास ठाऊक."
सोनू निगमने सोमवारी बरेच ट्विट करून सांगितले होते की "देव सर्वांना सलामत ठेव. मी मुसलमान नाही आहे आणि सकाळी अज़ानमुळे माझी झोप मोड होते. भारतात ही जबरदस्तीची धार्मिकता केव्हा थांबणार आहे."
 
या ट्विटसाठी त्याला ट्रोल करण्यात आले आणि बर्‍याच लोकांनी त्याला मुसलमान आणि इस्लाम विरोधी म्हटले. पण बरेच लोक त्याचे समर्थन देखील करत आहे.  

सोशल मीडिया वर होत असलेल्या हंगामानंतर सोनू निगमने ट्विट केले "जे लोक माझ्या ट्विटसला मुस्लिम विरोधी सांगत आहे त्यांना मी विचारतो की जर मी चुकीचे बोललो असेल तर मी माफी मागून घेईन."

वेबदुनिया वर वाचा