कॉग्रेसचे सतरा पक्षांसोबत स्नेहभोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात एकत्र येण्यासाठी  काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी  स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे. १७ पक्ष  या स्नेहभोजनात सहभागी होणार आहेत. मात्र बसपाच्या प्रमुख मायावती, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, सपाचे नेते अखिलेश यादव आणि तृणमूलच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे चारही नेते या स्नेहभोजनात सहभागी होणार नाहीत. चारही नेते आपले प्रतिनिधी या स्नेह भोजनासाठी पाठवणार आहेत.   लोकसभा निवडणुकांमध्ये   २०१९ मध्ये  सगळ्या विरोधकांना आपल्या सोबत आणण्यासाठी सोनिया गांधी प्रयत्न करणार आहेत. त्या अनुषंगाने त्या आज सगळ्या विरोधकांशी चर्चा  करणार आहेत.  २०१९ च्या निवडणुकांमध्ये काँग्रेस सोबत सगळे पक्ष आले तरच भाजपाला टक्कर देता येईल हे सोनिया गांधी यांना अधोरेखित करायचे आहे.  त्याचमुळे ही डिनर डिप्लोमसीची खेळी त्या खेळत आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती