राज्यसभेसाठी भाजपचीही तीन नावे निश्चित

राज्यसभेसाठी भाजपचीही तीन नावं निश्चित झाली आहेत. प्रकाश जावडेकर, नारायण राणे आणि केरळचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्ही.मुरलीधरन या तिघांना भाजपनं संधी दिली आहे. राज्यसभेवर महाराष्ट्रातून भाजपच्या कोट्यातून तीन खासदार जाणार आहेत. २३ मार्चला राज्यसभेची निवडणूक होणार आहे.
 
प्रकाश जावडेकर हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री आहेत. जावडेकर हे सध्या मध्य प्रदेशमधून भाजपचे राज्यसभा खासदार आहेत. त्यांचा कालावधी २ एप्रिलला पूर्ण होत आहे, त्यामुळे त्यांना यंदा महाराष्ट्रातून उमेदवारी देण्यात आली आहे.
 
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या नारायण राणेंचीही राज्यसभेवर वर्णी लागणार आहे. काँग्रेस सोडल्यावर राणेंनी महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाची स्थापना केली होती. राणेंच्या पक्षानं एनडीएला पाठिंबा जाहीर केला होता. राज्यामध्ये मंत्रीपदासाठी नारायण राणेंनी प्रयत्न केले पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांनी राणेंना राज्यसभेची उमेदवारी दिली. नारायण राणेंनी ही ऑफर स्वीकारली.
 
भाजपच्या तिसऱ्या जागेसाठी व्ही. मुरलीधरन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुरलीधरन हे केरळ भाजपचे अध्यक्ष आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती