लता मंगेशकर यांनी मोदीना रक्षाबंधनाच्या खास शुभेच्छा

सोमवार, 3 ऑगस्ट 2020 (17:01 IST)
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्षाबंधनाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींना शुभेच्छा देत त्यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून लता मंगेशकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रती आदर व्यक्त केला. 
 
त्या म्हणाल्या, 'नरेंद्र भाई रखीच्या शुभ समयी मी तुम्हाला प्रणाम करते. मी तुम्हाला आज राखी पाठवू शकली नाही याचं कारण सगळ्या जगाला माहित आहे. तुम्ही आपल्या देशासाठी मोलाचे काम करत आहात. अत्यंत चांगल्या गोष्टी जनतेसमोर मांडत असल्याचं म्हणत त्यांनी कोरोना पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. 
 
'भारताचे नागरीक तुमचं काम कधीही विसरू शकत नाहीत. आज देशातील असंख्य महिलांचा हात पुढे आहे, पण राखी बांधणं अशक्य आहे. तुम्ही सर्व परिस्थिती समजू शकता, तेव्हा वचन द्या तुम्ही भारताचं नाव उंच शिखरावर न्याल...नमस्कार' अशाप्रकारे लता मंगेशकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती