करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आले असून देशभरातील दुकानं, मॉल्स बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतलेल्या निर्णयानंतर आजपासून काही अटींसह दुकानं उघडता येतील. दुकानं उघडण्यास जरी परवानगी मिळाली असली तरी मॉल्स मात्र बंद ठेवण्यात येणार आहेत.
गृहमंत्रालयाने शुक्रवारी रात्री काढलेल्या पत्रकानुसार काही अटींवर देशातील सर्व दुकानं उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. आजपासून हा आदेश लागू झाला असून महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीतील निवासी भाग आणि परिसरातील दुकानं उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त मद्य विक्रीची दुकानं तसंच मॉल्स सुरू करण्याला अद्याप परवानगी देण्यात आली नाही. मद्यविक्रीची दुकानं ही एक्ससाइज कायद्यांतर्गत येतात. त्यामुळे ही दुकानं बंदच राहणार आहेत.