राज्यात कधी उघडणार वाईन शॉपस

बुधवार, 22 एप्रिल 2020 (08:50 IST)
कोरोनाचा व्हायसरचा प्रादुर्भाव देशात वाढत असून कोरोनाला रोखण्यासाठी देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक वस्तूंची अस्थापने सुरु ठेवण्यात आली असून इतर अस्थापने बंद ठेवण्यात आली आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोर पालन केलं जात असेल तर दारु विक्रीची दुकानं पुन्हा सुरु करण्यात येतील, असे विधान केले होते. या विधानावरून अडचणीत सापडल्यानंतर टोपो यांनी लगेच घुमजाव केला आहे. राज्यात दारू विक्रीला कोणतीही परवानगी देण्याचा सरकारचा विचार नाही, अशी सारवासारव त्यांनी केली आहे. म्हणजेच दुकाने ३ मे पर्यन्त उघडणार नाही. हे उघड होतय... 
 
लॉकडावूनमधून सूट देण्यात आलेल्या यादीत मद्यविक्री दुकानांचा समावेश नसला तरी याबाबत काटेकोरपणे नियमावली तयार करूनच अंतिम तो निर्णय जाहीर केला जाईल.
 
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी संध्याकाळी फेसबुक लाईव्ह करून राज्यातील जनतेशी आणि प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तरे दिली. केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये दारू विक्रीवर कडक निर्बंध घातले आहेत. मात्र, राज्य सरकारने दारू विक्रीबाबतच्या भूमिकेवर कोणतेही स्पष्टीकरण दिलं नाही. त्यामुळे राज्यात पुन्हा दारू विक्री सुरु करण्यात येणार आहे का ? असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला होता. त्याला उत्तर देताना टोपे यांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोर पालन केले जात असेल तर राज्यात पुन्हा दारु विक्री सुरु केली जाऊ शकते असे टोपे यांनी म्हटले होते.
 
फेसबुक लाईव्हनंतर टोपे यांना त्यांची चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेचच ट्विट करून त्यावर स्पष्टीकरण दिलं. लॉकडाऊनमधून सूट देण्यात आलेल्या यादीत मद्यविमद्यविक्री दुकानांचा समावेश नसला तरी याबाबत काटेकोरपणे नियमावली करुनच अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी सारवासारव आरोग्यमंत्री यांनी केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती