खेळताना चिमुकल्यांनी घेतलं विष

शनिवार, 4 डिसेंबर 2021 (10:58 IST)
खेळता खेळता मुलं काय करतील याची शाश्वती नसते. जेव्हा प्रौढ लोक लक्ष देत नाहीत, तेव्हा मुले अशा गोष्टी करतात ज्या अनेकदा धोकादायक असतात. मुलांना धोक्याची जाणीव होत नाही कारण त्यांना आपण काय करतोय याची जाणीव नसते. म्हणूनच जीवघेणी वस्तू मुलांच्या हातात पडणार नाहीत याची खात्री करणे महत्त्वाचे आहे. याची दखल घेतली नाही, तर काय होते, याचे उदाहरण नुकतेच समोर आले आहे.
 
खेळता खेळता विष खाल्ले
खेळत असताना तीन मुलांनी कीटकनाशक सेवन केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. झारखंडमधील गुमला भागात एकाच कुटुंबातील तीन मुले नेहमीप्रमाणे एकमेकांसोबत खेळत होती. पाच वर्षांची स्नेहा कुमारी, तीन वर्षांचा अश्विन पुरा आणि चार वर्षांचा अमित मिंज हे नेहमीप्रमाणे घरात खेळत होते. खेळता खेळता मुले घराच्या आतील खोलीत गेली. या खोलीत कीटकनाशकाची बाटली ठेवण्यात आली होती. त्यांच्या नकळत मुलांनी बाटली घेतली आणि विष त्यांच्या पोटात गेल्यामुळे तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती