धक्कादायक !महिलेच्या दोन्ही किडन्या चोरीला

सोमवार, 30 जानेवारी 2023 (13:59 IST)
आयुष्य वाचवणारे हे डॉक्टर देवाचं रूप मानले जातात. डॉक्टरांचं काम रुग्णांचे प्राण वाचवणं आहे. ज्यांच्या वर विश्वास ठेवून कुटुंबीय आपल्या रुग्णाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करतात त्याच डॉक्टरांनी विश्वासघात केला तर त्याला काय म्हणावं , असेच काहीसे घडले आहे बिहार मधील मुझफ्फरपूर येथे.एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरने महिलेच्या दोन्ही किडन्या चोरल्याचा आरोप केला असून आता ही महिला डायलेसिसवर आहे. अशा कठीण काळात तिचा पती देखील तिची साथ सोडून पळून गेला. आरोपी डॉक्टर देखील फरार आहे. या पीडित महिलेला  तीन मुलं असून माझ्या पश्चात माझ्या मुलांचं काय होणार हे म्हणत ती रडू लागते. 

या महिलेचे नाव सुनीता असून तिला गर्भाशयाचा आजार आहे. तिच्या वरगर्भाशयाशी संबंधित शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेत डॉक्टरांनी तिची फसवणूक केली आणि तिचं दोन्ही किडन्या काढून घेतला आणि पसार झाला. तिचा पती अकलू राम काही दिवस तिच्या सोबत होता आणि तिची चांगली काळजी घेत होता. तसेच तो आपल्या पत्नीला वाचविण्यासाठी आपली एक किडनी देखील देण्यास तयार होता. मात्र किडनी जुळली नाही म्हणून त्याला किडनी प्रत्यारोपण करता आले नाही. एकदा नवरा बायको मध्ये वाद झाले आणि नवरा मी आता तुझ्यासोबत राहू शकत नाही असे म्हणत आजारी बायकोला सोडून निघून गेला. आता सुनीतावर डायलेसिस सुरु आहे आणि ती आपले शेवटचे दिवस काढत आहे. सुनीतावर तिन्ही मुलांची जबाबदारी टाकून नवरा निघून गेला. पूर्वी सुनीता मोलमजुरीचे काम करत आपल्या नवऱ्याला साथ द्यायची आता आजारी पडल्यावर तिचा सांभाळ आणि काळजी घ्यायला देखील कोणी नाही. मुलांनी माझ्या पश्चात कुठं जावं त्यांचा काय दोष किंवा या आजारपणाला माझा काय दोष? माझ्या मुलांचं भविष्य आता पुढे काय ? असे प्रश्न तिच्यापुढे उद्भवत आहे.सुनीताची आई रुग्णालयात तिची काळजी घेत आहे.  पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत आरोपी डॉक्टरला शोधून अटक केली आहे. 
 
Edited By- Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती