शिवसेनेच्या नेत्याची गोळ्या घालून हत्या

बुधवार, 2 सप्टेंबर 2020 (14:25 IST)
मध्य प्रदेशातील शिवसेनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रमेश साहू यांची अज्ञात आरोपींनी गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यात ते जागीच मरण पावले. या गोळीबारात साहू यांची पत्नी व मुलगी जखमी झाली आहे. ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारात घडली.
 
मध्य प्रदेशचे माजी प्रदेशाध्यक्ष रमेश साहू यांची इंदौरजवळील उमरी खेडा येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली. रमेश साहू यांचा उमरी खेडा येथे साई राम ढाबा आहे. हत्येचा कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
 
सध्या ते पक्षात सक्रिय नव्हते. साहू 1990 च्या दशकात प्रदेशाध्यक्ष होते. तेव्हा त्यांनी अनेक चळवळींचे नेतृत्व केले होते.
 
पोलिस फरार अज्ञात आरोपींचा शोध घेत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती