मोदी सरकारने हटवली शरद पवार यांची सुरक्षा

शनिवार, 25 जानेवारी 2020 (13:39 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीमधील निवासस्थानी असणारी सुरक्षा हटवण्यात आली आहे. सुरक्षा हटवण्याआधी केंद्र सरकारकडून कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती असे सांगणत येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून या निर्णयावर आक्षेप नोंदवण्यात आला असून संताप व्यक्त   करण्यात आला आहे. 
 
केंद्र सरकारने जाणूनबुजून पवारांची सुरक्षा कमी केल्याचा आरोप राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
 
सुरक्षा काढली म्हणून पवार घराबाहेर पडणार नाहीत का? असा सवालही त्यांनी विचारला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून अतिमहत्त्वाच्या (व्हीव्हीआपी) व्यक्तींना सुरक्षा पुरवली जाते.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती