shahdol news : शहडोल जिल्हा रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल असलेल्या 13 वर्षीय मुलीचा सिकलसेल आजाराने मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूनंतर वडील नातेवाईकांसह मुलीचा मृतदेह दुचाकीवर ठेवून सुमारे 70 किलोमीटर अंतर कापण्यासाठी निघाले होते. मात्र, ही बाब जिल्हाधिकारी आणि सिव्हिल सर्जन यांना कळताच त्यांनी तातडीने वडिलांना थांबवून वाहनाची व्यवस्था केली. त्यानंतर मुलीचा मृतदेह वाहनाने तिच्या गावी नेण्यात आला.
वडील लक्ष्मण सिंह यांनी सांगितले की त्यांनी रुग्णालयातील कर्मचार्यांकडून शव वाहनाची मागणी केली होती, परंतु वाहन केवळ 15 ते 20 किलोमीटरच्या आत जाऊ शकते. रूग्णालयातील कर्मचार्यांनी मृताचे वडील लक्ष्मण सिंह यांना खाजगी वाहनाची व्यवस्था करण्यास सांगितले. मात्र वडिलांकडे तेवढे पैसे नसल्याने ते मृतदेह मोटारसायकलवरून घेऊन जात होते. त्यानंतरच जिल्हाधिकारी आणि सिव्हिल सर्जन यांना या प्रकरणाची माहिती मिळाली. अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि तातडीने मृतदेह नेण्यासाठी शव वाहनांची व्यवस्था केली.