Maternity leave : खासगी आणि सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नीती आयोगाच्या प्रस्तावानुसार आता महिलांना 9 महिन्याची प्रसूती रजा दिली जाऊ शकते. बाळंतपणाच्या सुरुवातीला गर्भवती महिलांना नवजात बाळाची काळजी घेण्यासाठी प्रसूती रजा (maternity leave) दिली जाते. नीती आयोगाचे सदस्य पीके पॉल म्हणाले की खाजगी आणि सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलां कर्मचाऱ्यांसाठी प्रसूती रजेचा कालावधी सहा महिन्यांवरून आता 9 महिन्यांपर्यंत वाढवण्याचा विचार केला पाहिजे. पॉल म्हणाले खाजगी क्षेत्रात मुलांचे चांगले संगोपन करण्यासाठी क्रॅच शिशु गृह उघडले पाहिजे. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सर्वांगीण काळजीसाठी यंत्रसामग्री उभारण्यासाठी निती आयोगाला खाजगी क्षेत्राने सहकार्य करावे.