काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाचा राजीनामा दिला

शुक्रवार, 26 ऑगस्ट 2022 (11:40 IST)
Ghulam Nabi Azad Resign: अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाचा निरोप घेतला आहे. म्हणजे पक्षाचा राजीनामा दिला आहे. यामागची कारणे अद्याप उघड झालेली नाहीत. पक्षाच्या धोरणांबद्दल ते बर्‍याच दिवसांपासून नाराज होते अलीकडेच त्यांनी जम्मू-काश्मीरमधील पक्षाच्या महत्त्वाच्या पदाचाही राजीनामा दिला होता.विशेष म्हणजे 2020 मध्येच त्यांनी पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले होते, ज्यामध्ये संघटनेच्या पातळीवर मोठे बदल करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी काँग्रेसमध्ये जी-23 गट चर्चेत आला होता, ज्यामध्ये आनंद शर्मा, मनीष तिवारी यांच्यासह अनेक नेते सामील होते.
 
शुक्रवारी आझाद यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला.यासंदर्भात त्यांनी सोनियांना पाच पानी पत्रही पाठवले आहे.विशेष म्हणजे या पत्रात त्यांनी पक्षाच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर मोठे प्रश्न उपस्थित केले आहेत.यावेळी त्यांनी 'जानेवारी 2013' चा विशेष उल्लेख केला आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती