हिंदी भवन, गाझियाबाद येथे आयोजित कार्यक्रमात जुना आखाड्याचे महामंडलेश्वर आणि दसना येथील देवी मंदिराचे महंत यती नरसिंहानंद यांनी भाषण केले होते. यामध्ये त्यांनी मेघनाथ आणि कुंभकरण यांच्या पुतळ्याचे दहन चुकीचे असल्याचे म्हटले आहे. यानंतर त्यांनी मोहम्मद साहेबांवर भाष्य केले.
यावर एआयएमआयएम, जमियत उलामा-ए-हिंद, मुस्लिम युवा मंच आणि इतर अनेक मुस्लिम संघटना महंतांच्या अटकेची मागणी करत रस्त्यावर उतरल्या आहेत. आंदोलक सातत्याने आंदोलन करत आहेत, त्यामुळे दसना मंदिराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.महंताच्या अटकेसाठी कैलाभट्टा येथे लोकांनी निदर्शने केली.