कानपूरजवळ अजमेर सियालदाह एक्सप्रेसचे १४ डबे घसरून २ प्रवासी ठार, तर अनेकजण जखमी झाल्याचे समजते. ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास कानपूरपासून ७० किलोमीटर अंतरावर रुरा रेल्वेस्थानकाजवळ एक कोरडा कॅनॉल ओलांडताना ही दुर्घटना घडली. याघटने मागील कारण अजून स्पष्ट झालेले नाही.