प्लॅस्टिक खाऊन टाकणाऱ्या एन्झाइमचा शोध लागला

आता प्लॅस्टिकलाच खाऊन टाकणाऱ्या एन्झाइमचा शोध लागल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. प्लॅस्टिक विघटनाबाबात पोर्टस्माऊथ विद्यापीठ आणि नॅशनल रिन्युएबल एनर्जी लॅबोरेटरी विभागाने महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. प्लॅस्टिकच्या बाटल्या, पिशव्या या साधारणपणे पॉलिथिन टेरेप्थॅलेट (पीईटी) पासून बनवल्या जातात. हे पीईटीच पचवून टाकेल असे द्रव्य संशोधकांनी आता शोधून काढलेय. ही द्रव्ये इतकी शक्तिशाली आहेत की शेकडो वर्षे नष्ट न झालेले प्लॅस्टिकही काही क्षणात विघटित होऊन त्याची विल्हेवाट लागू शकते.
 
जपानमधल्या एका प्लॅस्टिक पुनर्वापर केंद्रामध्ये सूक्ष्मजंतूच्या माध्यमातून संशोधन सुरू असताना या एन्झाइमचा शोध लागला आहे. सुरुवातीला फक्त एन्झाइमचे स्ट्रक्चर तयार करणे एवढेच संशोधकांचे उद्दिष्ट होते. मात्र संशोधकांनी त्यावर अधिक काम करीत शक्तिशाली एन्झाइम तयार केले. आता औद्योगिकदृष्टय़ा एन्झायमचा वापर करून प्लॅस्टिक विघटित कसे करता येईल यावर संशोधन सुरू आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती