सावरकर यांना भारतरत्न देणं हा शहीद भगतसिंह यांचा अपमान आहे. अशा शब्दात भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे कौन्सिल सदस्यचा नेता कन्हैया कुमारने सरकारवर टीका केली आहे. भाकपचे अहमदनगरमधील उमेदवार बहिरनाथ वाकळे यांच्या प्रचारसभेत तो बोलत होता. तुम्ही ईव्हीएम हॅकिंगच्या गोष्टी काय करता, मी ज्या बिहारचा आहे, तिथल्या मुख्यत्र्यांनाच भाजपनं हॅक केलं आहे, अशी जोरदार टीका कन्हैया केली.
महापालिकेची निवडणूक असली तरी भाजपवाले मोदींच्या नावाने मत मागतात. शेतकऱयांच्या आत्महत्या थांबव्यात, तरुणांना रोजगार मिळावे, असे महाराष्ट्रचे प्रश्न आहेत, यावर चर्चाच होत नाही. भाजप हा राजकीय पक्ष नाही, तर प्रत्येक वस्तूचं दुकान बनलं आहे. असे तो म्हणाला. सावकरांना पुरस्कार देणं हा निवडणुकीचा मुद्दा नाही, बेरोजगारी, तरुणांना नोकरी नाही, यावर प्रश्न विचारु नये म्हणू केलेला हा चुनावी जुमला आहे, असेही त्याने सांगितले.
कन्हैयाकुमार म्हणाला की, “महात्मा गांधी यांच्या हत्येमध्ये ज्या सावरकरांचा सहभाग होता. त्यांना भारतरत्न देण्याची घोषणा करणाऱ्या भाजपा सरकार हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहे. या सरकारच्या विरोधात बोलणारे पत्रकार, कलाकार, विद्यार्थी यांना दोषी ठरवून त्यांचा आवाज दाबण्याचे काम केलं जात आहे. सत्ताधारी पैसा कमवित आहेत. तर काही नेते पक्षांतर करून स्वतःकडील पैसा वाचवण्याची धडपड करीत आहे. सरकारकडून सरकारी संस्थांचा गैरवापर करून ईडीची भीती घातली जात आहे. राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नांकडे दुर्लक्ष करून संभ्रम निर्माण केला जात आहे. भाजपाकडून धार्मिक आणि इतर भावनिक प्रश्न उपस्थित केले जात आहे,” असा आरोप कन्हैयाकुमारने केला.
भाजपकडून सातत्यानं मोदींचा पर्याय काय असाच प्रश्न विचारला जातो. दुसरीकडे काँग्रेस व अन्य पर्याय असलेले नेते ‘ईडी’च्या भीतीने एका रात्रीत गांधीजींचे गुणगान सोडून नथुराम गोडसेची स्तुती करीत आहेत. त्यामुळं जनतेतून आता सर्वसामान्य पर्याय उभा राहिला पाहिजे. नोकऱ्या जात आहेत. शेतकरी आत्महत्या होत आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्न तसेच आहेत, महाराष्ट्रात मागच्या निवडणुकीत भाजप ने दिलेल्या आशासनांपैकी किती पूर्ण झाली. किती आश्वासनं पुन्हा देण्यात आली आहेत, हे कोणीच विचारत नाही. भाजपही त्यावर काही बोलत नाही,’ असं कन्हैया म्हणाला.