उल्लेखनीय आहे की 20 वर्ष जुन्या काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला पाच वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याने गुरुवारची रात्र करागृहात काढली. जोधपूर जेलमध्ये सलमान खान कैदी नंबर-106 आहे आणि त्याला बॅरक क्रमांक 2 मध्ये ठेवले गेले आहे. जेल प्रशासन त्याच्या सुरक्षेची काळजी घेत आहे. त्याने कुठलीही मागणी केलेली नाही. जेलमध्ये त्याला वरण-पोळी देण्यात आली पण तो जेवला नाही. त्याने सकाळचा नाश्ताही नकारला. सलमानवर निर्मात्यांचे 600 कोटी रुपये लागलेले आहेत.