सलमान खानची निर्दोष मुक्तता

जोधपूर- अवैधरीत्या शस्त्रास्त्र बाळगण्याच्या खटल्यात बॉलीवूड अभिनेता सलमान खानला मोठा दिलासा मिळालाय. जोधपूर कोर्टाने या प्रकरणात सलमान खानची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायाधीश दलपतसिंह राजपुरोहित यांनी निकाल देत सलमानची निर्दोष मुक्तता केली. सलमान खान आणि त्याची बहीण अलवीरा कालपासून येथे आलेले होते. आज सलमान कोर्टात उपस्थित राहिला आणि कोर्टाने आपला निर्णय सुनावला. सलमानविरोधी चार खटल्यामधील तिनामध्ये सलमानची निर्दोष मुक्तता झालीये. 
सलमानवर 1998 साली सिनेमा हम साथ-साथ है च्या शूटिंगदरम्यान एका चिंकारा जातीच्या हरणाची आणि दोन काळविटांची शिकार केल्याप्रकरणी खटला दाखल करण्यात आला. याव्यतिरिक्त त्यावर स्वत:जवळ लायसेंस अवधी संपलेले शस्त्र बाळगण्याचाही आरोप होता.  
 
सलमानवर एकूण चार खटले सुरू होते. त्यापैकी चिंकारा जातीच्या हरिणाची शिकार केल्याप्रकरणी दाखल दोन खटल्यांमध्ये सलमानची राजस्थान हायकोर्टानं निर्दोष मुक्तता केली आहे. अवैधरीत्या शस्त्र बाळगल्याच्या खटल्यावर आज जोधपूरमध्ये सुनावणी झाली असून दोन काळविटांच्या शिकारीचा खटला अजूनही सुरू आहे.
 

वेबदुनिया वर वाचा