सलमानच्या घरासमोरचे सार्वजनिक शौचालय हटणार नाही

गुरूवार, 4 मे 2017 (11:20 IST)

सलमान खानच्या घरासमोरील सार्वजनिक शौचालय हटवण्यास प्रशासनाने नकार दिला आहे. सलमान खानचे वडील आणि ज्येष्ठ लेखक सलीम खान यांनी घरासमोरील सार्वजनिक टॉयलेट हटवण्यात यावे अशी मागणी केली होती. त्यांनी महापौरांना यासंबंधी पत्र लिहिलं होतं. घरासमोरील सार्वजनिक टॉयलेटमुळे गैरसोय होत असल्याने ते हलवण्यात यावे, असं कारण सलीम खान यांनी महापौरांना दिलं होतं. मात्र प्रशासनाने त्यांची ही मागणी फेटाळून लावत स्पष्ट नकार दिला आहे. शौचालय स्वच्छ ठेवण्यासाठी काळजी घेतली जाईल, मात्र ते अन्यत्र हलवली जाणार नाही, असं उत्तर प्रशासनाकडून महापौरांना पाठवलं जाणार आहे. 

वेबदुनिया वर वाचा