पश्चिम बंगालमध्ये धार्मिक स्थळं १ जूनपासून सुरु होणार

शुक्रवार, 29 मे 2020 (22:25 IST)
पश्चिम बंगालमध्ये धार्मिक स्थळं १ जूनपासून सुरु होतील असे आदेश मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिले आहेत. धार्मिक स्थळं उघडली गेली तरीही काही अटी आहेत ज्यांचं पालन करावं लागेल असंही ममता बॅनर्जींनी म्हटलं आहे. तर ८ जून पासून सरकारी कर्मचारीही कामावर परततील असंही त्यांनी स्पष्ट केलं.  झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.
 
एका वेळी मंदिरात, मशिदीत किंवा चर्चमध्ये फक्त १० लोकांना जाण्याची मुभा असेल. तसेच सगळ्या धार्मिक स्थळांचं निर्जंतुकीकरण केलं जाईल तिथे रोज तशी व्यवस्था असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. ८ जूनपासून राज्यातील सगळ्या सरकारी आणि खासगी आस्थापनांमध्ये काम करणारे कर्मचारी हे कामावर परततील.  तसंच १ जून पासून पश्चिम बंगालमधली ज्यूट इंडस्ट्रीही सुरु होईल असंही त्यानी सांगितल. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती