ही यात्रा अयोध्येतून सुरू होणार असून रथयात्रेचा तामिळनाडूच्या रामेश्वरममध्ये समारोप होणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी 28 वर्षापूर्वी अयोध्येत रथयात्रा काढली होती. त्यानंतर प्रथमच अशाप्रकारची रथ यात्रा काढण्यात येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेचा विषय झाला आहे. यामध्ये 'रामराज्य' रथयात्रेसाठी विशेष रथ तयार करण्यात आला असून, हा रथ तयार करण्यासाठी 4 महिने लागले आहेत.