दिल्लीतील मेहरौली परिसरात श्रद्धा वालकरच्या हत्येनंतर आता राजस्थानमध्येही अशीच एक भयानक घटना घडली आहे. राजस्थानमधील नागौरमध्ये ही घटना घडली आहे. जिथे एका व्यक्तीने लग्नासाठी दबाव टाकत असल्यामुळे प्रेयसीची निर्घृण हत्या केली, तिच्या शरीराचे अनेक तुकडे करून तिला विहिरीत फेकून दिले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याने आपला गुन्हाही मान्य केला आहे.
वृत्तानुसार दिल्लीच्या मेहरौलीमध्ये श्रद्धा वालकरच्या हत्येनंतर आता राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातूनही असेच एक प्रकरण समोर आले आहे, जिथे लग्नासाठी दबाव टाकल्यामुळे प्रियकराने प्रेयसीची निर्घृण हत्या केली आणि नंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. अनेक तुकडे करून नागौरमध्ये अनेक ठिकाणी फेकले.