आला, आला पाऊस आला

येत्या चोवीस तासात मान्सून केरळमध्ये थडकणार आहे .मान्सूनने जमीनीवर आल्यानंतर त्याची वाटचाल वेगाने होणार असल्याचे  हवामान विभागाने सांगितले आहे.
 
सध्या अरबी समुद्रात केरळच्या किनारपट्टीपासून ते अगदी कर्नाटकाच्या किनारपट्टीपर्यत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे .हे क्षेत्र पुढील दोन दिवसात उत्तरेकडे म्हणजेच गोवा तसेच तळकोकणच्या दिशेने सरकणार आहे. याशिवाय अरबी समुद्राच्या पश्चिम किनारपट्टीवर समांतर ईस्ट वेस्ट शेअर झोन तयार झाला आहे. या दोन्ही बाबी मान्सून पुढे सरकण्यासाठी पोषक आहेत. त्यामुळेच येत्या चोवीस तासात मान्सून केरळमध्ये थडकणार आहे .विशेष म्हणजे अरबी समुद्रात केरळ पासून कर्नाटक पर्यत तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कायम राहणार आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती