रेल्वेने बदलले 'वंदे मेट्रो'चे नाव,आता हे नाव असेल

सोमवार, 16 सप्टेंबर 2024 (19:27 IST)
देशातील पहिली वंदे मेट्रो ट्रेन आज, सोमवारी भारताला मिळणार आहे. पंतप्रधान मोदी अहमदाबाद आणि गांधीनगरला जोडणाऱ्या मेट्रो रेल्वे सेवेच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण केले असून  उदघाटनापूर्वी वंदे मेट्रोबाबत रेल्वेकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वेने वंदे मेट्रोचे नाव बदलले आहे. आता ते 'नमो भारत रॅपिड रेल' म्हणून ओळखले जाईल.

पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अहमदाबाद-भुज वंदे मेट्रो ट्रेन (आता नमो भारत रॅपिड रेल) ​​नऊ स्थानकांवर थांबेल आणि कमाल 110 किमी प्रतितास वेगाने पाच तास 45 मिनिटांत 360 किलोमीटरचे अंतर कापेल. भुज येथून पहाटे 5:05 वाजता सुटून अहमदाबाद जंक्शनला 10:50 वाजता पोहोचेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. प्रवाशांसाठी तिची नियमित सेवा अहमदाबाद येथून 17 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि संपूर्ण प्रवासासाठी प्रति प्रवासी 455 रुपये भाडे असेल.

वंदे मेट्रो ट्रेन आणि देशात कार्यरत असलेल्या इतर महानगरांची विस्तृत माहिती देताना मंत्रालयाने सांगितले की, वंदे मेट्रो ताशी 110 किमी वेगाने धावते.ते प्रवास जलद पूर्ण करेल आणि कार्यक्षमता सुधारेल. त्यात म्हटले आहे की, वंदे मेट्रो ट्रेनमध्ये टक्करविरोधी 'कवच' सारख्या अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा सज्ज आहेत. रेल्वे मंत्रालयाने सांगितले की, वंदे मेट्रो ट्रेनमध्ये 12 डबे असतील, ज्यात 1,150 प्रवाशांची आसनक्षमता असेल.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, वंदे मेट्रो (आता नमो भारत रॅपिड रेल) ​​अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. ही ट्रेन पूर्णपणे अनारक्षित आणि वातानुकूलित आहे. ट्रेन सुटण्याच्या काही वेळापूर्वी प्रवाशांना काउंटरवरून तिकीट खरेदी करता येणार आहे.
Edited by - Priya Dixit  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती