बाबा रामरहीमच्या डेरा मुख्यालयावर पोलिसांनी छापा मारला आहे. या छाप्यामध्ये पोलिसांना मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा सापडला आहे. रामरहीमबाबत निर्णय यायच्या आधीच दक्षता म्हणून सिरसा आणि इतर जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी रामरहीमच्या अनुयायांना सगळी हत्यारे जमा करायला सांगितली होती. मात्र तरीही डेरा मुख्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा सापडला आहे. सोमवारी पोलिसांनी डेरा मुख्यालयामध्ये छापा टाकला असताना जवळपास घातक 34 हत्यारे जप्त केली आहेत. यामध्ये बंदूक, पिस्तूल आणि कार्बाईन मिळाले आहेत.
डेरा समर्थकांचा हा हिंसाचार बघून सुरक्षा यंत्रणांनी अश्रूधूर, हवेत गोळीबार आणि काही ठिकाणी गोळीबारही केला. या हिंसाचारामध्ये तब्बल 38 जणांना जीव गमवावा लागला आणि 300 पेक्षा जास्त जण जखमी झाले. सगळ्यात जास्त हिंसा पंचकुला आणि चंदिगडमध्ये झाली होती.