यु आर माय छम्मक छल्लो असे शाहरूक खान चे गाणे सर्वाना माहित आहे. अनेकदा गमतीत आपण गातो सुद्धा मात्र हा शब्द बोलल्या मुळे एकाला तुरंगात जावे लागले आहे. ठाण्याच्या कोर्टाने ‘छम्मकछल्लो’ या शब्दाचा वापर महिलेचा अपमान केला असल्याचा निकाल दिला आहे.छम्मक छल्लो शब्दामुळे त्यांना चीड आणि राग येतो असं कोर्टाने म्हटलं आहे.न्यायदंडाधिका आर टी इंगळे यांनी हा निकाल दिला आहे. त्यामध्ये त्यांनी या शब्दावर आक्षेप घेतला असून हा शब्द महिलांचा अपमान करणार आहे. त्यामुळे अश्या प्रकारे कोणी छेड काढत असेल तर चुकीचे आहे. भारतीय दंड विधान कलम 509 (शब्द, इशारे आणि वर्तणुकीमुळे महिलेचा अपमान) अंतर्गत गुन्हा केल्याचं नमूद केल आहे तर आरोपीला दोषी ठरवत त्याला केवळ एक रुपयाचा दंड ठोठावला आणि कोर्टाचं दिवसभराचं कामकाज होईपर्यंत कोठडी सुनावली आहे. घोडबंदर रोड परिसरातील ही 9 जानेवारी 2009 रोजी महिला सकाळी 9.14 वाजता पतीसह मॉर्निंग वॉक करुन घरी परतत होती. तेव्हा काही कारणांनी तिचा वाद एका सोबत झाला तेव्हा त्याने तिला छम्मक छल्लो आहे तू असे म्हटले होते. आज आठ वर्षांनी या केसाचा निकाल कोर्टाने दिला आहे.