काँग्रेसने गुजरातमध्ये भाजपविरोधात मोठे यश मिळवले हे म्हणायला हरकत नाही. भाजपच्या हाती सत्ता आली खरी पण सशक्त विपक्ष हा पक्षासाठी मोठा धक्का असणार आहे. दोन्ही पक्षांमध्ये अटतटीचा सामना पाहायला मिळाला. या सर्वात हार्दिक पटेलची साथ वगळता येणार नाही. भाजपच्या सीट्स कमी करण्यात हार्दिकच्या आंदोलना हातभार लावला हेही तेवढेच खरे.
भाजपसाठी गुजरात विधानसभा निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बाब होती होती कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याच गुजरातचे मॉडेल दाखवून देशात भाजपची सत्ता काबीज केली. काँग्रेसने भाजपला काँटे की टक्कर दिल्याचे दिसून आले आहेत. त्यामुळे यापुढे भाजपने काँग्रेसला कमी लेखण्याची चूक करू नये असे करणे महागात पडू शकते हे पक्षाने दाखवून दिले आहे.