वास्तविक भुल्लर एका हायस्पीड कारमध्ये स्टंट करताना दिसत आहे. कारच्या सन रूफवर बसून मंत्री कसे हात हलवताना दिसले, हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर सुरक्षा रक्षकही गाडीच्या खिडकीतून बाहेर लोम्बकळताना दिसले, ज्यांचा जीवही धोक्यात दिसला. चालत्या वाहनातून सनरूफमधून बाहेर पडणे हा गुन्हा आहे, जो मोटार वाहन कायद्याच्या कलम 184f चे उल्लंघन आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.मंत्रींच्या विरोधात कारवाई होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात परिवहन मंत्री भुल्लर म्हणाले की, माझे काही चुकले असेल तर मी माफी मागतो.