मिळालेल्या माहितीनुसार पंजाब सरकारने राज्यातील सर्व शाळांना, मग ते कोणत्याही बोर्डाचे असो, पंजाबी हा मुख्य आणि अनिवार्य विषय म्हणून शिकवणे अनिवार्य केले आहे.
यापूर्वी अशी बातमी होती की तेलंगणामध्ये आता तेलुगू हा अनिवार्य विषय म्हणून शिकवला जाईल. तेलंगणा सरकारने राज्यातील सीबीएसई, आयसीएसई, आयबी आणि इतर बोर्डांशी संलग्न शाळांमध्ये तेलगू हा सक्तीचा विषय म्हणून लागू करण्याचा आदेश जारी केला होता.