संगरूरच्या घावडा येथील मेरिटोरियस शाळेत अन्नातून विषबाधा झाल्यामुळे सुमारे 60 मुले आजारी पडली. मुलांना संगरूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी पोटदुखी व उलटीचा त्रास घेऊन 20 बालके रुग्णालयात पोहोचली होती, त्यापैकी 14 बालकांना घरी सोडण्यात आले, मात्र शनिवारी सकाळी 35 बालकांना पोटदुखी व उलटय़ांचा त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या 50 हून अधिक मुलांवर रुग्णालयात उपचारसुरू आहेत.
डॉक्टरांनी सांगितले की, प्राथमिक तपासणीत मुलांना अन्नातुन विषबाधा झाली. त्याचा तपास सुरु आहे. अन्नाचे नमुने गोळ्या करण्यासाठी एक टीम पाठवली आहे. या मुलांना दिवाळीपासून जेवल्यानंतर पोटदुखीची समस्या जाणवत होती. जेवणात किडे आढळले .याची तक्रार मुलांनी केली होती. मुलांचे पालक काळजीत आहे. त्यांचे म्हणणे आहे. मुलांना जेवण चांगले मिळत नाही. शाळा व्यवस्थापनावर कारवाई झाली पाहिजे, असे मुलांच्या पालकांचे म्हणणे आहे. जेवणाचा दर्जा तपासला नाही. शाळेचे स्वतःचे वसतिगृह आहे. मुले वसतिगृहात राहून अभ्यास करतात. बाहेरून कोणालाही आत प्रवेश नाही.
या प्रकरणाबाबत जिल्ह्याच्या उपायुक्तांनी आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागाची अनेक पथके तयार केली असून, ते आठवडाभरात या घटनेचा अहवाल सादर करतील. संगरूर सरकारी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की, काल रात्री 20 मुले आली होती.आज सकाळी सुमारे 35 मुले आली आहेत. सर्व मुलांची प्रकृती सुधारत आहे. पोटदुखी, उलट्या होत असल्याची तक्रार घेऊन आले होते.
या प्रकरणाबाबत शिक्षणमंत्री हरजोत बैंस यांनी वसतिगृहाच्या कॅन्टीनचे कंत्राट रद्द केले आहे. यासह चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. शिक्षणमंत्र्यांनी24 तासांत अहवाल मागवला आहे. कोणत्याही गुन्हेगाराला सोडले जाणार नाही,असे ते म्हणाले.