अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) वादग्रस्त मुस्लिम धर्मगुरू झाकीर नाईकच्या मुंबई आणि पुण्यामधील संपत्तीवर टाच आणली. पुणे आणि मुंबईमधील १६.४० कोटी रुपयांच्या संपत्तीवर ईडीने टाच आणली. ईडीने मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत जप्तीची कारवाई केली. याआधी देशविरोधी कृत्ये करणे, भडकावून भाषण आदी आरोप झाकीर नाईकवर आहेत. तसेच त्याच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन संस्थेने परदेशातून बेहिशेबी देणग्या जमविल्याचा आरोप आहे.