NEET 2024 Scam प्रियंका गांधींनी रिझल्टला घोटाळा म्हटले, NEET परीक्षा रद्द होणार का?

शुक्रवार, 7 जून 2024 (15:24 IST)
एनटीएने 4 जून 2024 रोजी नीट परीक्षा परिणाम जाहीर केला आहे. तथापि परीक्षेतील तथाकथित गैरप्रकारांबाबत विद्यार्थ्यांचा संताप सोशल मीडियावर सातत्याने पाहायला मिळत आहे. या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की NEET परीक्षेशी संबंधित गैरप्रकारांची चौकशी व्हायला हवी.
 
प्रियंका गांधी यांनी X अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली ज्यात लिहिले आहे की आधी NEET परिक्षेचा पेपर लीक (NEET Paper Leak) झाला आणि आता निकालातही घोटाळा झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. एकाच केंद्रातील सहा विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 गुण मिळाल्याने अनेक गैरप्रकार समोर येत असल्याने गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. दुसरीकडे निकाल लागल्यानंतर देशभरात अनेक मुलांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या येत आहेत. हे खूप दुःखद आणि धक्कादायक आहे.
 
त्या पुढे म्हणाल्या की सरकारने विद्यार्थ्यांचा आवाज ऐकला पाहिजे. NEET परीक्षेशी संबंधित हेराफेरीची चौकशी झाली पाहिजे. चौकशी करून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी सरकारची आहे.
 
NEET परीक्षेत अनेक गैरप्रकार समोर येत आहेत. विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स (NEET Grace Marks) बद्दल राग आहे. सोशल मीडियावर एनटीएकडून उत्तर मागितले जात आहेत. NTA ने यासंदर्भात नोटीस जारी केली आहे. मात्र विद्यार्थ्यांना 718 आणि 719 ग्रेस गुण कोणत्या आधारावर देण्यात आले हे स्पष्ट करण्यात आले नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती