पंतप्रधान नरेंद्र मोदी बनले जगातील सर्वात लोकप्रिय नेते

शुक्रवार, 21 जानेवारी 2022 (11:38 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रसिद्धी भारतातच नाही तर जगभरात आहे. त्यांची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे. अमेरिकन डेटा इंटेलिजेंस फर्म मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्सने जारी केलेल्या ग्लोबल रेटिंग सर्व्हेच्या अहवालानुसार, जगातील लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पंतप्रधान मोदी पहिल्या स्थानावर आहेत. 71 टक्के रेटिंगसह पीएम मोदी हे सर्वेक्षणात अव्वल ठरले आहेत.
 
दुसरीकडे, मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर 66 टक्के रेटिंगसह दुसऱ्या तर इटलीचे पंतप्रधान मारियो ड्रैगी 60 टक्के रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर आहेत.
 
13 जागतिक नेत्यांच्या यादीत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन 43 टक्के रेटिंगसह सहाव्या क्रमांकावर आहेत. बायडेन यांच्यापाठोपाठ कॅनडाचे राष्ट्राध्यक्ष जस्टिन ट्रुडो 43 टक्के आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन 41 टक्क्यावर आहेत.
 
नोव्हेंबर 2021 मध्ये देखील पंतप्रधान मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांच्या यादीत शीर्षस्थानी होते. मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्स सध्या ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, भारत, इटली, जपान, मेक्सिको, दक्षिण कोरिया, स्पेन, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्समधील नेत्यांच्या रेटिंगचा मागोवा घेत आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती