भारताचे 15 वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांची निवड झाली आहे. राष्ट्रपती निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार असलेले कोविंद राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने निवडून आले. आज झालेल्या मतमोजणीत रामनाथ कोविंद यांना सात लाख, दोन हजार, 644 म्हणजेच एकूण मतदानापैकी 65.65 टक्के मते, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या उमेदवार मीरा कुमार यांना तीन लाख, 67 हजार 314 म्हणजेच एकूण मतदानापैकी 34.35 टक्के एवढी मते मिळाली आहेत. संसदेच्या महासचिवांनी कोविंद यांना फोन करून राष्ट्रपतीपदी त्यांच्या विजयाची औपचारिक माहिती दिली आहे.