राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या घटनेने निराश आणि भयभीत झाल्याचे म्हटले आहे. यावर राष्ट्रपतींनी जोरदार भाष्य केले असून आता फार झाले, असे म्हटले आहे. महिलांवरील गुन्ह्यांमुळे मी व्यथित असल्याचे त्यांनी सांगितले.
कोलकातामध्ये घडलेल्या प्रकरणाचा निषेध म्हणून निर्दशने केली जात आहे. तरीही अद्याप गुन्हेगार पीडितांच्या शोधात इतरत्र लपून बसले आहेत. समाजाला प्रामाणिक, नि:पक्षपाती आत्मनिरीक्षणाची गरज आहे. कोणताही सुसंस्कृत समाज मुलींवर आणि बहिणींवर असे अत्याचार होऊ देऊ शकत नाही.
दयनीय मानसिकता महिलांना कमी माणूस, कमी सामर्थ्यवान, कमी सक्षम, कमी बुद्धिमान म्हणून पाहते.निर्भया प्रकरणानंतर या 12 वर्षांत समाजाने अनेक बलात्काराना विसरला आहे. विसर पडण्याचा हा आजार घृणित आहे. या विकृत प्रवृत्तीशी योग्य पद्धतीने सामना करावा लागणार. जेणे करून यावर आळा बसेल.