काँग्रेसची निवडणूक तयारी, जबाबदाऱ्याचे केले वाटप

गुरूवार, 24 जानेवारी 2019 (16:56 IST)
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील प्रचाराची रणनिती ठरविण्याची जबाबदारी काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे सोपविली आहे. तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे जाहीरनामा समितीची जबाबदारी सोपीवण्यात आली आहे.लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महाराष्ट्रातल्या जबाबदाऱ्यांची घोषणा अखिल भारतीय काँगेस कमिटीकडून दिल्लीतून करण्यात आली. 
 
यात सुशीलकुमार शिंदे यांना प्रचार समितीचे अध्यक्ष तर पृथ्वीराज चव्हाण यांना जाहीरनामा समितीचे अध्यक्ष करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे समन्वय समितीची तर प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे निवडणूक समितीची जबाबदारी देण्यात आली असताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे. कुमार केतकर यांच्याकडे माध्यम नियोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती