राम मंदिरासाठी 10 फूट लांबीचे कुलूप तयार, जाणून घ्या त्याचे वैशिष्टये

मंगळवार, 11 जानेवारी 2022 (23:30 IST)
अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या श्रीराम मंदिरासाठी अलीगडमध्ये 400 किलोचे कुलूप तयार करण्यात आले आहे. सध्या हे कुलूप अलीगढच्या राज्य औद्योगिक आणि कृषी प्रदर्शनात ठेवण्यात आले आहे, जिथे लोक ते पाहत आहेत. प्रदर्शनाला भेट देणारे 10 फूट उंच कुलूपसह दिवसभर सेल्फी घेताना दिसतात. प्रदर्शनानंतर ते अयोध्येतील राम मंदिर प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.
 
वैशिष्टये -
या कुलूपाची चावीचे वजन  30 किलो आहे , अलीगढच्या ज्वालापुरी येथील रहिवासी सत्यप्रकाश यांनी कारागिरांच्या सहकार्याने हे कुलूप बनवले आहे. या कुलुपाची जाडी 6 इंच, लांबी 10 फूट आणि रुंदी 6 फूट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते उघडण्यासाठी आणि बंद करण्यासाठी डिझाइन केलेल्या चावीचे वजन 30 किलो आहे. त्यात दोन चाव्या आहेत. त्याच्या तयारीसाठी सुमारे एक लाख रुपये खर्च झाले आहेत.
सत्यप्रकाश यांची इच्छा आहे की, 26 जानेवारी रोजी दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्येही कुलूप समाविष्ट करण्यात यावे. यासाठी त्यांनी सीएम योगी आणि पीएम मोदींना पत्र पाठवून विनंती केली आहे. जर अशी संधी मिळाली तर अलिगढची ही प्रतिभा संपूर्ण देशाला पाहायला मिळेल, असे ते म्हणतात.
 
याआधीही 300 किलोचे कुलूप बनवले होते,
65 वर्षीय सत्य प्रकाश शर्मा यांचा कुलुपांचा जुना व्यवसाय आहे. तो ऑर्डरनुसार कुलूप तयार करताटत आणि पुरवतात. यापूर्वी त्यांनी 300 किलोचे कुलूप बनवले होते, जे अलीगढच्या प्रदर्शनाची शान ठरले. आता यावेळी त्याने 400 किलो वजनाचा लॉक बनवून स्वतःचाच विक्रम मोडला आहे.
अयोध्येला पाठवण्यापूर्वी या कुलूपमध्ये अनेक बदल करण्यात येणार असल्याचे सत्यप्रकाश यांनी सांगितले. लोखंडी हुक्क, पेटी, लिव्हर पितळेचे असतील. कुलूपच्या मुख्य भागावर स्टीलची स्क्रॅप शीट लावली जाईल.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती