नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज यांच्या विद्यमाने आयोजित सद्गुरू यांच्या माती वाचवा' कार्यक्रमाच्या निमित्ताने सद्गुरू नाशिककरांच्या भेटीला येत आहेत. सदरच्या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झालेली असून नागरीकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झालेली आहे. कार्यक्रमाला होणारी गर्दी लक्षात घेऊन वाहतूक आणि पार्किगसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. जेणेकरून कुणाचीही गैरसोय होणार नाही. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ऑनलाईन रजिस्टेशन अनिर्वाय असून ते पूर्णपणे मोफत स्वरूपाचे आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर मिळणारा ई-पास बघूनच सगळ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.
मातीचे प्रदूषण रोखण्यासाठी आणि याबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी ईशा फांउडेशनचे संस्थापक सद्गुरु अर्थात जग्गी वासुदेव संपूर्ण जगात माती वाचवा'ची (सेव्ह सॉईल) ची मोहीम हाती घेतली आहे. यात सद्गुरू यांची जागतिक यात्रा सुरु आहे. या यात्रेअंतगर्त सद्गुरू ११ जून अर्थात उद्या नाशिकमध्ये येत असून नाशिककरांशी संवाद साधणार आहेत. शहरातल्या केटीएचएम महाविद्यालयाच्या मैदानावर दुपारी ४:३० वाजता सदरचा कार्यक्रम संपन्न होत आहे. यावेळी मनुष्याचे मातीसोबत असलेले नाते सांगणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जाणार आहे. सोबतच सद्गुरु यांना नाशिकचे दर्शन घडवणार कार्यक्रमही संपन्न होणार आहे.