आमदार प्रशांत परिचारक यांचे अखेर निलंबन

गुरूवार, 9 मार्च 2017 (15:02 IST)
सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आमदार प्रशांत परिचारक यांचं अखेर निलंबन झालं आहे. परिचारक यांना दीड वर्षासाठी निलंबित करण्यात आल्याची घोषणा, सभापती रामराजे निंबाळकर यांनी केली. परिचारकांच्या वक्तव्याच्या चौकशीसाठी 9 सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. यामध्ये विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर अध्यक्ष असतील.तर मितीमध्ये चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँग्रेस आमदार नारायण राणे, राष्ट्रवादीचे आमदार सुनील तटकरे, जयंत पाटील, ‘लोकभारती’चे आमदार कपिल पाटील, काँग्रेसचे आमदार शरद रणपीसे, शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे हे सदस्य असतील”, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.

वेबदुनिया वर वाचा