जनधन खात्यात एवढी मोठी रक्कम जमा झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे पश्चिम बंगाल आणि कर्नाटक राज्यातून 'जनधन' खात्यात सर्वाधिक रक्कम जमा झाली आहे. काही दिवसांपूर्वी जनधन खाते हे निष्क्रिय व त्यामध्ये काहीच रक्कम नसल्याने या योजनेवरच मोठी टीका करण्यात आली होती. असंघटित क्षेत्रातील लोकांना बँकिंग व्यवहाराची सवय लागावी यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री जनधन योजना लागू केली होती.