मिळालेल्या माहितीनुसार पीएम मोदी 29, 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर रोजी ओडिशात असतील. यावेळी पीएम मोदी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचीही बैठक घेणार आहे. भुवनेश्वरमध्ये पोलिस महासंचालक आणि पोलिस महानिरीक्षकांची अखिल भारतीय परिषद आयोजित केली जाणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदीही सहभागी होणार आहे. या कार्यक्रमात पीएम मोदींशिवाय अमित शाह आणि अजित डोवाल हे देखील सहभागी होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी भुवनेश्वरमधील बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ रोड शो करणार आहे. यानंतर ते एका सभेलाही संबोधित करू शकतात. भारतीय जनता पक्ष (भाजप) ओडिशा युनिटचे अध्यक्ष मनमोहन सामल यांनी ही माहिती दिली. मनमोहन सामल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 नोव्हेंबर रोजी दुपारी 4.15 वाजता भुवनेश्वरला पोहोचतील, तेथे त्यांचे जोरदार स्वागत केले जाईल. यानंतर ते विमानतळाजवळ सभेला संबोधित करू शकतात.