पीएम किसान योजना :या तारखेला येणार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे
मंगळवार, 17 मे 2022 (14:04 IST)
शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मोदी सरकारकडून दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. हे पैसे प्रत्येकी 2,000 रुपयांच्या हप्त्यांमध्ये वर्षातून तीनदा दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे 10 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात आले आहेत.
पी एम किसान योजनेचे लाभार्थी अनेक दिवसांपासून 11 व्या हफ्त्याची वाट बघत आहे. शेतकरी कडून केवायसी प्रक्रियेत विलंब होत असल्यामुळे हफ्ते येण्यास विलंब होत आहे. सरकारने केवायसी करण्याची शेवटची तारीख आता 31 मे केली आहे.
शेतकऱ्यांनी लवकरात लवकर केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. पीएम किसानच्या शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये येणार आहे. 31 मे रोजी शेतकयांच्या खात्यात 11 व्या हफ्त्याचे पैसे येतील. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
या हफ्त्याचे पैसे 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान जमा करायचे आहे. मात्र 80 टक्के शेतकऱ्यांनी केवायसी करण्याचे काम केले आहे. या योजने अंतर्गत 31 मे पर्यंत 11 व्या हफ्त्याचे पैसे जमा करायचे आहे. यंदा केवायसी ज्या शेतकऱ्यांनी केली नसेल त्यांनी लवकरात लवकर करून घ्यावी अन्यथा खात्यात2000 रुपये येणार नाही.
या वर्षी हफ्ता उशिरा येत आहे. गेल्या वर्षी हा एप्रिल -जुलैचा हफ्ता 15 मे रोजी आला होता. यंदाच्या वर्षी हा 31 मे पर्यंत येण्याची शक्यता आहे.