या तारखेला खात्यात येणार 2000 !

गुरूवार, 22 फेब्रुवारी 2024 (12:23 IST)
केंद्र सरकार राबवत असलेली पीएम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत सरकारने आतापर्यंत 15 हप्ते शेतकऱ्यांना दिले आहेत. 
 
आता 28 फेब्रुवारी 2024 रोजी 16 वा हप्ताही शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे. या तारखेला डीबीटीद्वारे देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता पाठवला जाईल.
 
पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये दिले जातात. ही रक्कम दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांना हप्ता म्हणून दिली जाते. प्रत्येक हप्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये येतात.
 
गेल्या वेळी सरकारने 27 नोव्हेंबर 2024 रोजी 15 वा हप्ता जारी केला होता. आता सरकारने 16 वा हप्ता जारी करण्याची तारीखही जाहीर केली आहे.
 
सरकारने देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू केली असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी आणि जमीन पडताळणी करणे आवश्यक आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती