PM मोदी यांच्या मथुरा रॅलीत होऊ शकते वन रॅक, वन पेन्शनाची घोषणा

सोमवार, 25 मे 2015 (13:04 IST)
केंद्राची मोदी सरकार वन रॅक, वन पेन्शन योजनेला सुरू करण्याची घोषणा करण्यासाठी तयार आहे. सरकार वन रॅक, वन पेन्शनामध्ये 25 लाख माजी सैनिकांसाठी 8,300 कोटी रुपये देऊ शकते. माजी सैनिक मागील बर्‍याच वर्षांपासून वन रॅक, वन पेन्शनाच्या मागणीसाठी प्रदर्शन करत होते, पण त्यांचा हक्क अद्याप ही त्यांना मिळालेला नाही आहे.  
 
सरकारी सूत्रांनी सांगितले की वन रॅक, वन पेन्शनाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मथुरा रॅलीत सोमवारी होऊ शकते. महत्त्वाचे म्हणजे या रॅलीचे आयोजन एनडीए सरकारचे एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर सरकारचे कृत्ये मोजण्यासाठी करण्यात येत आहे.  
 
दुसरीकडे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि माजी रक्षामंत्री एके एंटनी यांनी वन रॅक, वन पेन्शनाला घेऊन मोदी सरकारवर शनिवारी हल्ला बोलला होता. दोन्ही नेत्यांचा दावा होता की मोदी सरकार जाणून बुजून वन रॅक, वन पेन्शनाला सुरू करण्यास उशीर करत आहे, जेव्हाकी  आधीच्या यूपीए सरकारने फेब्रुवारी 2014मध्ये याची घोषणा केली होती.   
 

वेबदुनिया वर वाचा