पासपोर्ट मिळवण झाल सोपं, पोलीस तपासणी होणार शिथील

मंगळवार, 31 जुलै 2018 (09:03 IST)
पासपोर्ट मिळण्यात पोलिसांकडून होणाऱ्या तपासणीमुळे सर्वाधिक विलंब होतो. आता पासपोर्ट विभाग या प्रक्रियेत बदल करणार असून, मोजक्याच प्रकरणात पोलीस अर्जदाराच्या घरी जातील. इतर प्रकरणात त्यांना अर्जदाराच्या घरी जाण्याची गरजच भासणार नाही. यासाठी पासपोर्ट विभाग सर्व राज्यांच्या पोलिसांकडून गुन्ह्यांची माहिती मिळण्यासाठी चर्चा करीत आहे. त्यामुळे ज्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्यास लवकर पासपोर्ट मिळू शकेल.
 
अर्ज करणार्‍यास एक ते तीन दिवसांत पासपोर्ट मिळावा, असे विभागाचे प्रयत्न आहेत. सध्या आधार क्रमांक देणाऱ्यास पासपोर्ट दिल्यानंतरही तपासणी केली जाते, पण राज्यांकडील गुन्ह्यांच्या माहितीद्वारेच अर्जदाराच्या थेट तपासणीचा प्रयत्न पासपोर्ट विभाग करीत आहे. शेजार्‍याकडे जाऊन अर्जदाराची माहिती मिळविणे वा अर्जदार एकाच पत्त्यावर तीन वर्षे राहतो आहे का, हे पाहणे हे नियम शिथिल केले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती