मुंबईला जाणाऱ्या अकासा एअर विमानात प्रवाशाचा मृत्यू, भोपाळ मध्ये इमर्जन्सी लँडिंग

शुक्रवार, 16 ऑगस्ट 2024 (17:47 IST)
वाराणसीहून मुंबई जाणाऱ्या अकासा  एअरलाईन्सच्या विमानात एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याने विमानाची इमर्जन्सी लँडिंग भोपाळला करण्यात आली. डॉक्टरांच्या पथकाने प्रवाशाला तपासून त्याची मृत्यूची पुष्टी केली. प्रवाशाचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्यानं झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले. 
 
गुरुवारी 172 प्रवाशांसह आकासा एअर वाराणसी-मुंबई फ्लाइटला भोपाळच्या राजा भोज विमानतळावर एक प्रवासी आजारी पडल्याने आपत्कालीन लँडिंग करावे लागले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
 
दुपारी एक वाजता विमान मुंबई विमानतळावर उतरणार होते, मात्र त्यापूर्वीच विमानातील एका प्रवाशाची प्रकृती अचानक बिघडली. आपत्कालीन परिस्थिती पाहता विमानाच्या क्रू मेंबरने भोपाळ विमानतळावर संपर्क साधून आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली. भोपाळ राजाभोज विमानतळ प्राधिकरणाने तात्काळ लँडिंगची परवानगी दिली पण जेव्हा विमान उतरले आणि वैद्यकीय पथकाने प्रवाशाची तपासणी केली तेव्हा तो मृत झाल्याचे आढळून आले. मृत प्रवाशाबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
Edited by - Priya Dixit   
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती